Nagpur Crime: Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: नागपूरमध्ये रक्तरंजित थरार! तरुणावर तलवार अन् चाकून सपासप वार, वाचवायला गेलेल्या २ मित्रांनाही सोडलं नाही

Nagpur Police: नागपूरमध्ये तरुणावर चाकूने अन् तलवारीने हल्ला करण्यात आला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना देखील हल्ला करण्यात आला. या घटनेने नागपूर हादरले.

Priya More
  • नागपूर खापरखेडा येथे रक्तरंजित थरार

  • जुन्या वादातून तरुणावर तलवार अने चाकूने हल्ला

  • तरुणाला वाचवायला गेलेल्या दोन मित्रांवरही हल्ला

  • या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये रक्तरंजित थरार घडला. रात्री भररस्त्यात तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरील मुख्य बाजारपेठेत रविवारी रात्री ही घटना घडली. जुन्या वादातून भररस्त्यात तलवारी, फावडे आणि चाकूंनी तरुणावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या दोन मित्रांवर देखील हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये तिघेही जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दगडी चाळ टोळीतील आरोपींनी हातात तलवार, फावडे आणि चाकू घेऊन परिसरात धुमाकूळ घातला. या हल्ल्यात हिमांशू रवी कडू हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेले रक्षित कापसे आणि रोहित मेश्राम यांनाही आरोपींनी बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी केले. रक्षितची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सूरज कावळे (वय २५ वर्षे), शुभम उर्फ शेरू उईके (वय २५ वर्षे), संघर्ष बागडे (वय १९ वर्षे), साहिल उर्फ बूटऱ्या बागडे (वय २२ वर्षे) आणि सुदामा मधुकर छापाडहाके (वय २५ वर्षे) यांच्यासह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सूरज कावळे आणि शुभम उर्फ शेरू उईके हे कुख्यात सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती आहे.

मारहाणीनंतर आरोपींनी "दगडी चाळीत येऊन दाखवा" अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सुमित आणि डग्गम हे दगडी चाळीकडे जात असताना त्यांनी वाटेत हिमांशूला सोबत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रविवारी रात्री हिमांशू जीवाच्या भीतीने घराच्या दिशेने पळत असताना त्याला वाचवण्यासाठी रक्षित कापसे आणि रोहित मेश्राम बॅरिकेड ओलांडून आले. मात्र आरोपींनी रक्षितवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून हिमांशूचा पाठलाग करत त्याला घराजवळ गाठले आणि तलवार आणि चाकूने वार केले. "मार डाला" अशी आरडाओरड करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिरात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: धुळ्यात भरधाव ट्रॉलाची तीन वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू

६ बंडखोर खासदार,५० टक्क्यांहून अधिक आमदार NDAची साथ सोडणार; मोठा राजकीय भूकंप होणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Dharashiv Politics: धाराशिवमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने, १० ते १२ वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

Pratapgad Fort : शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार! प्रतापगड किल्ल्याची 'ही' अनोखी गोष्ट अनेकांना माहीतच नाही

SCROLL FOR NEXT