बॉयफ्रेंडसोबत लग्नासाठी घरच्यांचा विरोध; तरुणीने रचला अपहरण-बलात्काराचा बनाव! (Video) SaamTvNews
महाराष्ट्र

बॉयफ्रेंडसोबत लग्नासाठी घरच्यांचा विरोध; तरुणीने रचला अपहरण-बलात्काराचा बनाव! (Video)

१९ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते. मात्र, घरच्यांचा होणारा विरोध पाहून तरुणीने आपल्यावरती अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी तक्रार पोलिसात नोंदवली!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : १९ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरासोबत लग्न (Marriage) करायचे होते. मात्र, तिच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत करायचे ठरवले होते व तिच्यासाठी स्थळ देखील निश्चित केले होते. आपल्या प्रियकरासोबत (Boyfriend) लग्न करण्यासाठी घरच्यांचा होणारा विरोध पाहून तरुणीने आपल्यावरती अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी तक्रार पोलिसात नोंदवली आणि पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, या तरुणीचे पितळ उघडे पडले असून या बनावाची घटना नागपूर (Nagpur) मध्ये उघडकीस आली आहे.

पोलिसांनी या बाबतीत दुजोरा दिला नसला तरी प्रेम (Love) प्रकरणातून खोटी तक्रार दिल्याची चर्चा मात्र नागपुरात रंगली आहे. यातील फिर्यादी मुलगी नागपूरच्या रामदास पेठ भागात संगीत क्लासला संगीत शिकण्यासाठी यायची. नेहमी प्रमाणे ती क्लासला आली. मात्र, रामदास पेठ परिसरात ओम्नीगाडीने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी बुट्टीबोरी चा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आपल्याला अपहृत करून कळमना परिसरातील चिखली भागात नेऊन बलात्कार (Rape) केल्याची तक्रार तिने कळमना पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली.

घटनेचे गांभीर्य आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. जवळपास 250 च्या वरती CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासले. 1000 च्या वर पोलीस कर्मचारी, स्वतः पोलीस आयुक्त या तपासात सहभागी झाले आणि तक्रारीनुसार तपासणी केली. मात्र, या तरुणीने ने सांगितलेल्या घटनास्थळी ती घटनाक्रमातील वेळेनुसार गेली नसल्याचे तपासातून पुढे आले. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच तक्रार खोटी असल्याची कबुली फिर्यादी तरुणीने दिली आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. एखाद्या सिनेमाला शोभणारी ही स्टोरी होती. मात्र, यात पोलिसांची कठोर परीक्षा देखील होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT