Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : शाळेत भयंकर घडलं, विद्यार्थिनीला अंगावर वळ उमटेपर्यंत अमानुष मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur Crime News : नागपूरमधील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल न्याय अधिनियम व RTE अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरमधील शाळेत सातवीच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

  • शिक्षिका व मुख्याध्यापिकेवर गंभीर आरोप

  • शाळा प्रशासनाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा

  • विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

"छडी लागे छम छम, विद्या येई गम गम" या कवितेच्या ओळी जरी खऱ्या असल्या तरी, या छडीचा अतिरेक झाला तर एखाद्या चिमुकल्या जीवावर देखील बेतू शकतं. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. वर्गात आरसा आणल्याच्या कारणावरून चालू वर्गात शिक्षिकेने अमानुषपणे मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सना (बदललेलं नाव) नागपूरमध्ये एका नामांकित शाळेत इयत्ता सातवीत शिकते. २२ जानेवारी रोजी हिंदी विषयाचा तास सुरू असताना, मैत्रिणीकडून आरसा घेऊन दुसऱ्या विद्यार्थिनीला देत असताना शिक्षिकेने सनाला पाहिलं. आणि शिक्षिकेचा पारा चढला. संबंधित शिक्षिका तसलीम परवीन यांनी मुलीला कोणतेही कारण न देता ५ ते ६ जोरात कानाखाली मारल्या आणि वर्गाबाहेर काढले.

धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता सना शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापिका नासरीन अख्तर यांनी तिला केबिनमध्ये बोलावून स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या हाता-पायावर गंभीर जखमा झाल्या असून ती प्रचंड मानसिक दडपणाखाली आली. पीडित मुलीने याप्रकरणी कुटुंबियांना सांगितले असता सनाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाकडे दाद मागितली, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.अखेर २५ जानेवारी रोजी '१०९८ चाईल्ड हेल्पलाईनकडे तक्रार करण्यात आली.

चाईल्ड हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तातडीने मुलीच्या घरी भेट देऊन तिचे समुपदेशन केले आणि जबाब नोंदवले. २६ जानेवारीला पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. २७ जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल न्याय अधिनियम २०१५, कलम ७५ आणि भारतीय न्याय संहिता (BNS)115(2),118(1), 3(5), व RTE 2009 कलम 17 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Saree Designs: पांढऱ्या साडीच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणावरही उठून दिसतील

Maharashtra Live News Update: CTET देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करा - खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळे ८२,३०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Heart Damage Symptoms: ही ४ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय झालंय खराब; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

Ajit Pawar Unseen Photos: अजित पवार यांचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो

SCROLL FOR NEXT