Nagpur Crime: Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Nagpur Police: नागपूरमध्ये सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर संचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संचालकाला अटक करण्यात आली.

Priya More
  • नागपूरच्या सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

  • सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

  • अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर कारवाई

  • सैनिकी स्कूलच्या संचालकाला अटक

नागपूरच्या सवानेर तालुक्यातील सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लौंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी संचालकाला पोक्सोसह विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली ‘बॅड टच’, अश्लील चाळे आणि लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त केल्याचा विद्यार्थिनींनी आरोप केला. १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर केळवद पोलिसांनी शाळेच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. १७ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत असे सांगितले की, अकॅडमीचा संचालक हरिश्चंद्र गोपाळ राणे (वय ३८ वर्षे) हा मध्यरात्री मुलींना कार्यालयात बोलावून अश्लील चाळे करायचा, निद्रावस्थेत विनयभंग करायचा तसेच लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करायचा.

आरोपी संचालक मध्यरात्री मुलींना कार्यालयात बोलावून छळ करत होता असा ओराप पीडितेने केला आहे. विद्यार्थिनींनी दोन महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या निदर्शनास प्रकार आणून दिल्याचा आरोप आहे. मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. अकॅडमीतील ५६ विद्यार्थ्यांमध्ये १४ मुली आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर १४ पैकी ११ विद्यार्थिनींनी शाळा सोडली आहे. नागपूर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या अत्याचार प्रकरणात संचालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळण्यासाठी पोलिसांकडूून कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींनी हा प्रकार दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक विद्यालयातील शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अकॅडमीतील ५६ विद्यार्थ्यांपैकी १४ मुली होत्या. ही घटना समोर येताच ११ मुलींनी प्रवेश रद्द करत शाळेतून काढता पाय घेतला. या अमानवीय घटनेमुळे संतप्त पालकांनी सैनिकी शाळेची मान्यता त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

SCROLL FOR NEXT