Wardha Crime News चेतन व्यास
महाराष्ट्र

Wardha: नागपूर पोलिसांचा फोन अन् ५० व्या मिनिटाला वर्धा पोलिसांनी खूनातील आरोपीला केलं जेरबंद

Wardha Crime News: नागपूर पोलीस तरुणीच्या मारेकऱ्याचा शोध घेत असतानाच त्याचा मोबाइल लोकेशन वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे दाखवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा: नागपूरच्या कोराडीजवळच असलेल्या सुरादेवी मार्गावरील एका निर्जनस्थळी तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी नागपूर (Nagpur) येथे घडली होती. नागपूर पोलीस तरुणीच्या मारेकऱ्याचा शोध घेत असतानाच त्याचा मोबाइल लोकेशन वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे दाखवले. नागपूर पोलिसांचा वर्धा पोलिसांना आरोपी वर्धा जिल्ह्यात असल्याचा फोन आला, अन् ५० व्या मिनिटाला आरोपीची हिंगणघाट येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरातून धरपकड केली. (Wardha Crime News)

हे देखील पाहा -

नागपूर पोलिसांचे पथक हिंगणघाट येथे दाखल झाल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अंकित यशवंत रंधाये (२५) रा. खापरखेडा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अंकित रंधाये हा हत्या करून फरार झाला होता. नागपूर पोलीस त्याच्या शोधात असतानाच नागपूर येथील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी आरोपीचे लोकेशन हिंगणघाट शहराकडे असल्याची माहिती वर्धेच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली.

गायकवाड यांनी याची माहिती हिंगणघाट ठाण्यातील कर्मचारी विवेक बनसोड आणि शेखर डोंगरे यांना देताच त्यांनी लगेच हिंगणघाट शहरात रात्रीला२ गस्त घालून त्यांच्या खबऱ्यांना विचारपूस केली. अखेर दुचाकीवरुन जात असलेल्या आरोपी अंकितला दोन पोलिसांनी अटक करुन नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला अटक करुन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून कागदात गुंडाळलेले दोन रक्ताने माखलेले सिमकार्ड, दोन दुपट्टे आणि मेमरीकार्डही जप्त करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT