Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपुरात पोलीसच असुरक्षित; पोलिसाच्या घरावरच चोरांचा डल्ला, बंदूक आणि काडतुसे गायब

Nagpur News: नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसाच्या घरावरच चोरट्यांनी हात घातलाय.चोरट्यांनी पोलिसाच्या घरात घुसून बंदूक, काडतुसे गायब केले आहेत. नागपूरच्या पोलीस वसाहतीत घडलेल्या या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पराग ढोबळे

Nagpur Crime News

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसाच्या घरावरच चोरट्यांनी हात घातलाय.चोरट्यांनी पोलिसाच्या घरात घुसून बंदूक, काडतुसे गायब केले आहेत. नागपूरच्या पोलीस वसाहतीत घडलेल्या या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. (Latest News In Marathi)

पोलीस कर्मचारी मंगेश लांजेवार यांच्या घरात ही चोरी झाली आहे. नागपुरात राज्य राखीव दलाच्या कमांडंटचे गनमॅन असलेल्या मंगेश यांच्या बंदुकीच्या ३० गोळ्यांसह पिस्तूल चोरीला गेले आहे. धक्कादायक म्हणजे, ही चोरी पोलीस वसाहतीतील कर्मचाऱ्याच्या घरात घुसून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोर थेट आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

राज्य राखीव पोलीस दलातील कार्यरत असलेले मंगेश लांजेवार हे पोलीस वसाहतीत राहतात. साप्ताहिक सुट्टी असल्याने मंगेश हे भंडारा येथे गेले होते. बाहेर जाताना त्यांनी पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे घरातच ठेवली होती.

चोरट्यांनी मंगेश यांच्या घराचे कुलूप तोडूनन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचेही कुलूप तोडले आणि पिस्तूल- काडतुसे चोरुन नेली. मंगेश पुन्हा नागपूरला परतल्यावर घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

घरात गेल्यावर बंदूक आणि काडतुसे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT