Chandrashekhar Bawankule: राम मंदिर उभारणीसाठी मोंदींना पंतप्रधान व्हावे लागले; भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

Chandrashekhar Bawankule on Ram Mandir: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'राम मंदिर उभारणीसाठी मोंदींना पंतप्रधान व्हावे लागले, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Saam tv
Published On

Chandrashekhar Bawankule :

अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच राम मंदिरावरून राजकीय नेत्यांकडून श्रेयवाद सुरु झाला आहे. तसेच राम मंदिर आणि हिंदुत्ववाद या मुद्द्यावरून इंडिया आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राम मंदिराच्या श्रेयवादादरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'राम मंदिर उभारणीसाठी मोंदींना पंतप्रधान व्हावे लागले, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिर उभारणीवरून काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. '५२७ वर्षांपासून अयोध्येत रामलल्ला तंबूत होते. भारतातील लोकांना कमळाला मत द्यावं लागलं. तेव्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हावे लागले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून राम मंदिराचा प्रश्न सोडवून घेतला. हे देशातील १४० कोटी लोकांना माहिती आहे. त्यामुळे काही लोकांना राम मंदिर उभारणीचं दु:ख आहे, असा टोला बावनकुळे यांनी काँग्रेसला लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bawankule
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा ग्राऊंड फ्लोअर तयार; अयोध्या परिसरात कुठे काय असणार? जाणून घ्या एका क्लिकवर

कोणत्याही राजकीय सर्व्हे वर भाजपच राजकारण चालत नाही : बावनकुळे

'सी व्होटर सर्व हा फक्त १५०० लोकात केला जातो. लोकसभा मतदारसंघ हे २० लाख मतदार संख्यापर्यंत आहेत. राजस्थान , मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सर्व्हे केले होते. काय निकाल आले समोर आले हे माहिती आहे. त्यामुळे आम्ही सी-व्होटरच्या जीवावर राजकारण करत नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी निवडणूक पूर्व सर्व्हे करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com