Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : दारू पिऊन वडिलांची आईला मारहाण; चिडलेल्या मुलाकडून भयानक कृत्य

Nagpur News : दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. नशेत पत्नीला व मुलाला शिवीगाळ करत आणि मारहाण करत होता. रोज होणाऱ्या या त्रासाला मुलगा व पत्नी देखील त्रासले होते

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : घरात दारू पिऊन वडिल आईला नेहमी शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास नेहमीचाच झालेला असल्याने या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलानेच वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. वडिलांचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना मात्र अडकला. यानंतर प्रकरण पोलिसात पोहचल्यानंतर मुलगा व आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत इंगोलेनगर परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुकेश शेंडे (वय ५७) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. मुकेश हा हार्डवेअरच्या दुकानात काम करायचा. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. दारूच्या नशेत घरी येत पत्नीला व दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला शिवीगाळ करत आणि मारहाण करत होता. रोज होणाऱ्या या त्रासाला मुलगा व पत्नी देखील त्रासले होते. 

आईला शिवीगाळ करत असल्याचे पाहून मुलगा चिडला 

दरम्यान घटनेच्या दिवशी रात्री देखील मुकेश दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रोजचा विषय असल्यानं पत्नी उर्मिलाने दुर्लक्ष करत स्वतांपाक करण्यास लागली. स्वयंपाक करण्यास उशीर झाल्याने मुकेशने पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान मुलगा घरी परतला होता. आईला वडील शिवीगाळ होताना पाहून तो चिडला. त्याचा राग अनावर झाला शाब्दिक वाद हाणामारीत बदललं.  

मुलगा व पत्नी ताब्यात 

मुलाने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना बेडवरून खाली ओढले. यावेळी दोघात हातापायी झाली. त्यामुळे मुलाच्या नाकाला दुखापत झाली. यामुळे मुलाने रागाच्या भरात वडील मुकेश यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. यानंतर मुकेश शेंडे याचा मृतदेह पोत्यात बांधून नदीत फेकण्याचा तयारीत असताना प्रकरण पोलिसात पोहचले. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि मुकेशची पत्नी उर्मिलाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

रुग्णालयात उपचार घेणं आता महाग होणार? रुग्णालयातील खर्चात 70 टक्क्यांनी वाढ

Belly Fat Loss Food: जिम न जाताही वजन होईल कमी! रोज सकाळी रिकाम्या पोटी 'या' पदार्थाचे करा सेवन

Pune News: खाकी वर्दीतला देवमाणूस! गोळीबार सुरु असताना जीव धोक्यात घालून वाचवला जीव; पुण्यातील घटना; पाहा VIDEO

23 हजार IT कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, मेटा, मायक्रोसॉफ्टकडून नोकरकपात?

SCROLL FOR NEXT