Nagpur Crime News Sana Khan Case Big Twist Shocking information in police investigation Saam TV
महाराष्ट्र

Sana Khan Case Update: सना खान हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

Satish Daud

Sana Khan Murder Case Update: नागपूर येथील भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी या हत्याप्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सना खानची हत्या केलेला आरोपी अमित साहू हा सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. (Latest Marathi News)

आरोपी अमित साहू हा 35 वर्षीय महिलेला हाताशी धरून धनदांडग्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर त्यांच्या अश्लील व्हिडीओ क्लीप काढून व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळायचा. याप्रकरणी पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी अमित साहू आणि त्याच्या जबलपूरमधल्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अमित साहूने अशाच प्रकार अनेकांची फसवणूक केल्याची माहिती आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा देखील समावेश असल्याचं कळतंय. दरम्यान, पोलिसांनी अमित शाहू आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी, ब्लॅकमेल, गुन्हेगार कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

या सेक्सटॉर्शनच्या रॅकेटमध्ये आणखी किती आरोपी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, समोर आलेल्या या नवीन प्रकरणामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचं गुढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पोलिसांना या हत्या प्रकरणाचा तपास करताना मध्य प्रदेशातील हरदामधील शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडला होता.

हा मृतदेह सना खानचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सापडलेला मृतदेह सना खानचा नसल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस आता या मृतदेहाची DNA टेस्ट करणार आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT