पराग ढोबळे
नागपूर : हायटेक पद्धतीचा अवलंब करून सॉफ्टवेअर बेस असलेल्या कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले असून नागपुरात हि मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देशभरात विविध राज्यात जाऊन टोळी सक्रिय होती. (Nagpur News) वेगवेगळ्या भागात जाऊन वाहन चोरी करत होते. गाडी चोरी केल्यानंतर ते वाहन बनावट आरसी बुक, कागदपत्र तयार करून दिल्ली, मणिपूर, नागालँड, आसाम, हैद्राबाद या ठिकाणी वाहनांची विक्री करायचे. यात प्रामुख्याने सॉफ्टवेअर बेस असलेल्या कारची चोरी करत होते. सॉफ्टवेअरच्या मदतीने गाडी सुरू करून त्या घेऊन जायचे. प्रत्येक राज्यात गेल्यानंतर गाडीची नंबर प्लेट बदलविली जायची.
तसेच चोरलेल्या (Crime news) गाडीचे डुप्लिकेट आरसी बुक सुद्धा असायचं. डुप्लिकेट फास्ट टॅग वापरत असल्याने टोलवर सुध्दा या गाड्यांची नोंद सापडत नव्हती. अर्थात दिल्लीतून चोरलेली गाडी नागपुरात आणायची, नागपुरातून चोरलेली गाडी मणिपूर किंवा आसाममध्ये नेऊन विकायचे. ही टोळी हाय प्रोफाइल असून यात आतापर्यंत पोलिसांच्या हाती फक्त गाडी पोहचून देणारे आणि विक्री करणारे लागले आहेत.
सहा गुन्हे उघडकीस
दरम्यान या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मास्टर मणिपूरमध्ये असून तेथील तणावपूर्ण परिस्थितीमुळे या मास्टर माईंडचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान यात ६ गुन्हे गुघडकीस आले असून पोलिसांनी ११ चार चाकी वाहन हस्तगत करत चौघांना अटक केली आहे. साधारण दीड कोटींचा घरात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.