Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News In Nagapur : शिक्षक झाला हैवान! शाळेतील अल्पवयीन मुलीवर सलग ६ महिने अत्याचार; नागपुरमधील संतापजनक घटना

पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सक्करदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली असून या बाबत तक्रार दाखल केली.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagapur Crime News : नागपुरमधून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक बातमी समोर आली आहे. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र नागपुरात नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी सहाव्या वर्गात शिकत असून ती वय १२ वर्षांची आहे. संजय विठ्ठल पांडे असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सक्करदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली असून या बाबत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या मुसक्या आवळ्या आहेत. सध्या या प्रकरणी पोलीस अधित चौकशी करत आहेत.

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. डोंबिवलीमध्ये देखीस अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आलाय.या प्रकरणी पीडित पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT