Nagpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेची प्रियकराकडून दगडाने ठेचून हत्या; बसचालक आरोपीला अटक

Crime News Update: विवाहित महिलेचे आणखी लोकांशी संबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता, याच वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे...

मंगेश मोहिते

Nagpur Crime News: विवाहीत महिलेची तिच्या प्रियकराकडून दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. शनिवार (२५, मार्च) रोजी या खळबळजनक हत्येचा खुलासा झाला असून आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या भीषण हत्येने नागपूर शहर परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित विवाहित महिला गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार 23 मार्चला वाठोडा पोलीसांना दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास कार्याला सुरूवात केली होती. तपासादरम्यान, या महिलेचे दिपक इंगळे नामक एसटी बस चालकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना लागली. याच माहितीद्वारे पोलिसांनी त्याला चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूली दिली.

घटनेच्या दिवशी गुरूवार दि हिंगणा परिसरातील रुई शिवारात दीपक विवाहित महिलेला घेऊन गेला. विवाहित महिलेचे आणखी लोकांशी संबंध असल्याचा संशय त्याच्या मनात होता. यावरुनच दोघांमध्ये भांडण झाला. या भांडणातूनच त्याने दगडाने ठेचून महिलेचा खून केला. शनिवारी संध्याकाळी वाठोडा पोलिसानी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास बाठोडा पोलिस करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT