Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपुरात ३२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सीताबर्डी परिसरातील धक्कादायक घटना

Nagpur Crime News: याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News: महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नागपुरात एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला आहे. सीताबर्डी परिसरात रविवारी (२५ जून) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिला ही मध्यप्रदेशातील आहे. पीडिता आपल्या पतीपासून विभक्त राहत असून तिला दोन मुले देखील आहे. साधारण ३ वर्षांपूर्वी पीडितेची ओळख फेसबुकवरून पिंटू गजभिये याच्याशी झाली होती.

पिंटूने या महिलेला नोकरी मिळऊन देण्याचा बहाण्याने भेटायला नागपुरात बोलावले होते. रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पीडित महिला बसने मध्यप्रदेशातून नागपूर स्थानकावर आली. तिथून आरोपीने तिला कारमध्ये बसवून नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये नेले.

यादरम्यान पिंटू गजभिये आणि त्याचा सहआरोपी कार्तिक चौधरी यांनी महिलेवर बलात्कार केला. रात्रभर तिला गाडीत बसवल्यानंतर पुन्हा सीताबर्डी कॅम्पसमध्ये आणून सोडण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने तातडीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही तर होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

Shocking: डॉक्टरच्या निधनाने खळबळ, रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला मृतदेह

Diabetes drink: हे तीन घटक एकत्र उकळून प्या; डायबेटीस रूग्णांची वाढलेली साखर झटक्यात येईल कमी

SCROLL FOR NEXT