Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा; काही तासातच टोळीचा पर्दाफास

मंगेश मोहिते

नागपूर : लहान मुलांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र यातील तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध (Police) पोलीस घेत आहेत. अगदी काही तासात (Kidnapping) अपहरण (चोरीला) गेलेल्या 8 महिन्याच्या मुलाचा शोध घेऊन पोलिसांनी आई वडिलांच्या स्वाधीन केले. (Maharashtra News)

नागपूरच्या (Nagpur) कळमना परिसरात गुरूवारी दुपारच्या वेळी घरासमोरच राहणाऱ्या एका व्यक्तीने आठ महिन्याच्या बाळाला घेऊन फरार झाला. आई- वडिलांनी रात्रीपर्यंत शोधाशोध केली. मात्र मिळून न आल्याने रात्री दहा वाजता पोलिसात (Nagpur Crime) तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपले चक्र फिरवले आणि तीन पोलीस स्टेशनचा स्टाफ या कामात लावला. अगदी काही तासात पोलिसांनी या अपहरणकर्त्याचा शोध घेतला.

अडीच लाखात सौदा

आधी मुलाला हस्तगत केले आणि मग पोलिसांच्या समोर जे आले ते काही वेगळेच होते. अपहरण करणारा हा मुले चोरणारे टोळीतील सदस्य असून तो या परिसरात काही दिवसांपासून भाड्याची खोली घेऊन राहत होता. यातील जे दलाल होते, त्यांच्यापर्यंत मुलाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या टोळीतील सदस्यांनी एका जणाला मुलगा पाहिजे होता. त्याला बोलावले आणि अडीच लाखात सौदा केला. हा सौदा एका ऑटो चालकाच्या मार्फत झाला असून यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

तीन जण झाले फरार

तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र तीन जण कुणकुण लागताच पळून गेले. पोलिसांच्या मते आणि त्यांना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून ही मुले चोरणारी टोळी मोठी आहे. त्‍यांनी याआधी सुद्धा अनेक मुल चोरली असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

SCROLL FOR NEXT