Dhule: गुंगीकारक औषधांचा साठा; ४४० बाटल्‍या जप्‍त

गुंगीकारक औषधांचा साठा; ४४० बाटल्‍या जप्‍त
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा आढळून आला आहे. हा साठा आझाद नगर पोलिसांनी (Police) जप्त करत एका संशयिताला ताब्‍यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
सीओंनीच घेतली एनओसीसाठी लाच; २० हजार घेताना एलसीबीच्‍या ताब्‍यात

धुळे (Dhule News) शहरातील हमाल मापाडी परिसरात एक इसम त्याच्या राहत्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधीची बेकायदेशीर विक्री करीत होता. याबाबतची गुप्त माहिती आझाद नगर पोलीसांना मिळाली होती. पोलिसांनी याबाबत तपास करत छापा टाकला.

४४० बाटल्‍या जप्‍त

मिळालेल्‍या माहितीच्या आधारे हमाल मापाडी परिसरात छापा टाकून गुंगीकारक औषध (कोरेक्स) रेक्सॉन टी सिरप याच्या जवळपास 440 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून या औषधांची चोरटी विक्री करणाऱ्या सौंषयीतास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com