CSK vs PBKS : पंजाबचा ७ गडी राखून विजय, प्लेऑफच्या शर्यतीती कायम; चेन्नईची वाढली डोकेदुखी

CSK vs PBKS IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला दोन षटकं बाकी ठेवून सहज विजय संपादन केला.
CSK vs PBKS
CSK vs PBKS Saam Digital

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला दोन षटकं बाकी ठेवून सहज विजय संपादन केला. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता. नंतर पंजाबने चेन्नई सुपर किंग्जचाही पराभव केला. मोठी गोष्ट म्हणजे चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर पंजाबने हा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 7 विकेट गमावत 162 धावांचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवलं होतं. पंजाबने हे लक्ष्य ३ गड्यांच्या बदल्यात १७.५ षटकातच गाठलं.

पंजाबच्या संघाने गेल्या दोन हंगामात चार वेळा चेन्नईचा पराभव केला आहे. पंजाबने चेन्नईचा सलग पाचव्यांदा पराभव केला आहे. या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर पंजाब संघाची कामगिरी सातत्याने चांगली झाली नसून या संघाने बलाढ्य संघांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं आहे. चेन्नईला पराभूत केल्यानंतर हा संघ आता गुणतालिकेत 7व्या स्थानावर पोहोचला आहे, त्याचे 10 सामन्यांत 8 गुण आहेत.

चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 50 चेंडूत 64 धावा जोडल्या. मात्र, यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लवकर तंबूत परतले. शिवम दुबे पहिल्याच चेंडूवर तर रवींद्र जडेजा अवघ्या 2 धावांवर बाद झाला. यानंतर समीर रिझवीसह कर्णधार गायकवाडने डाव सावरला मात्र या काळात चेन्नईने ५५ चेंडूत एकही चौकार लगावला नाही.

CSK vs PBKS
CSK vs PBKS: चेन्नईत CSKच्या धावसंख्येची 'स्लो चेन्नई एक्स्प्रेस'; पंजाबसमोर माफक १६३ धावांचं आव्हान

गायकवाडने अर्धशतक झळकावत 48 चेंडूत 62 धावा केल्या. पण तरीही चेन्नईचा संघ स्कोअरबोर्डवर केवळ 162 धावा करू शकला, त्यामुळे पंजाबसाठी एक विजयाची एक संधी मिळाली. राहुल चहरने 4 षटकात 16 धावा देत 2 बळी घेतले. हरप्रीत ब्रारने 4 षटकात 17 धावा देत 2 बळी घेतले. पंजाबच्या या दोन फिरकीपटूंनीच चेन्नई सुपर किंग्जला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही.

CSK vs PBKS
Ayush Badoni Runout: आयुष बदोनी खरंच आऊट होता का? वाचा नेमकं काय घडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com