Nagpur Kambale Double Murder Case  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Kambale Case: न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Kambale Double Murder Case: बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात नागपूर विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला ३ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नागपूर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस.बी. गावंडे यांनी हा निकाल दिला.

१७ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपुरातल्या (Nagpur) न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या ५५ वर्षीय आई उषा आणि दीड वर्षांची मुलगी राशी यांची हत्या करण्यात आली होती. आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला.

त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीडवर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून (Crime News) दिले होते. पोलिसांनी या प्रकरणी किराणा दुकानदार गणेश शाहू याची पत्नी आणि भावांना अटक केली होती.

गणेशची पत्नी गुडिया शाहू आणि भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही आजी-नातीच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिस (police) तपासात उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गणेश शिवभरण शाहू याच्यासह ३ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

गणेश हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी व भाऊ अंकित यांचा समावेश आहे. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT