nagpur, savner police station, patansaongi  saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News : पाटणसावंगीत सराफाला लुटले, दरोडेखोरांचा गोळीबार; सावनेर पाेलीसांचा तपास सुरु

सावनेर पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

संजय डाफ

Patansaongi News : नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे बेछूट गोळीबार करत सराफाला लुटल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या लुटीत दराेडेखाेरांनी ३० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली आहे. सावनेर पोलीसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती पाेलीस ठाण्यात देण्यात आली. (Maharashtra News)

या घटनेबााबत पाेलीसांनी दिलेली माहिती अशी - किशाेर वामनराव मर्जिवे (राहणार. पाटणसावंगी, ता. सावनेर) यांचे गावातच किशाेर वामनराव मर्जिवे नामक साेन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानातील दागिने आणि राेख रक्कम बॅगेत ठेवली. दुकान बंद करण्यापूर्वी ती बॅग दुचाकीवर ठेवली.

त्याचवेळी एका दराेडेखाेराने ती बॅग नदीच्या दिशेने पळविली. दराेडेखाेराचा एक साथीदार नदीच्या काठावर, तर दुसरा पात्रात उभा हाेता. किशाेर मर्जिवे यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी दराेडेखाेरांचा पाठलाग केला. मात्र, दराेडेखाेरांनी नागरिकांच्या दिशेने गाेळीबार करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्या बॅगमध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ३० लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती किशाेर मर्जिवे यांनी पाेलिसांना (police) दिली.

या घटनेची माहिती मिळताच सावनेर पाेलिस (savner police) घटनास्थळी पाेहचले. पाेलिस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी, घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पाटणसावंगी येथे तळ ठाेकला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

कुसुंबी-इटनगाेटीच्या दिशेने पळाले

तिन्ही दराेडेखाेर पायी आले हाेते. नदीच्या काठी अथवा परिसरात काेणतेही वाहन आढळून आले नाही. गाेळीबार केल्यानंतर तिन्ही दराेडेखाेर कुसुंबी-इटनगाेटी मार्गाने पळून गेले. संपूर्ण घटनाक्रम विचारात घेता ही घटना पूर्वनियाेजित असून, दराेडेखाेर किशाेर मर्जिवे यांच्यावर पाळत ठेवत असावे. शिवाय, दाेघे अंधारात वेगवेगळ्या ठिकाणी उभे हाेते. दराेडेखाेरांनी त्यांचे वाहन नदीच्या (river) पलीकडे ठेवले असावे, अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT