Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Police : दिल्लीवरून येत नागपुरात मेट्रो प्रवास; दुचाकी चोरून करायचे चैन स्नॅचिंग; आंतरराज्य टोळी पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News : दिल्लीवरून रेल्वेने नागपुरात दाखल व्हायचे. यानंतर मेट्रोने एखाद्या स्टेशन पर्यंत पोहोचायचं आणि पार्किंग मधील एखाद्या दुचाकीचा हँडल लॉक तोडून चोरी केलेल्या दुचाकीने शहरात फिरायचे

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या चैन तोडून चोरटे पसार होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी पोलीसांनी तपास करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान हे चोरटे दिल्लीवरून उपराजधानी नागपुरात येऊन चेन स्नॅचिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने चैन स्नॅचिंग करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून यात अक्षय शर्मा, रोहित कुमार आणि सुरेश कुमार असे अटेकतील आरोपीचे नाव आहे. तर चौथा आरोपीचा शोध सुरू आहे. चार जणांनी टोळी दिल्लीवरून रेल्वेने नागपुरात दाखल व्हायचे. यानंतर ते मेट्रोने एखाद्या स्टेशन पर्यंत पोहोचायचं आणि पार्किंग मधील एखाद्या दुचाकीचा हँडल लॉक तोडून चोरी केलेल्या दुचाकीने शहरात फिरायचे व सोनसाखळी लांबवत असायचे. .

चार महिन्यांपासून सुरु होता शोध 

चेन स्नॅचिंगच्या करून चोरलेली दुचाकी अज्ञात स्थळी सोडून परत दिल्लीला रेल्वेने परत जायचे, मात्र आता त्यांचं बिंग फुटले आहे. तर नागपूर पोलिसांनी मागील चार महिन्यात सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करत वेगवेगळ्या पथकांमार्फत त्यांचा शोध घेतला. यानंतर दिल्ली रेल्वे स्टेशनवरून तिघांना अटक केली आहे. तर चौथा साथीदार फरार आहे.

२० पेक्षा जास्त चेन स्नॅचिंगच्या घटना उघड 

पोलिसांनी तीन आरोपीना दिल्लीतून केली अटक करत त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या शहरात २० पेक्षा जास्त चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर अक्षय आणि रोहित कुमार या दोन आरोपींवर २० पेक्षा जास्त गुन्हे दिल्ली आणि इतर शहरात दाखल आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इतिहासात प्रथमच सोलापूरमधील सीना नदीला महापूर, 26 गावात शिरले पाणी

Shani Nakshatra Parivartan: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणार शनीचं नक्षत्र परिवर्तन; 'या' राशींना मिळणार चांगल्या संधी

Sharad Pawar Setback : शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार साथ सोडणार, भरसभेत केलं मोठं वक्तव्य

Shardiya Navratri 2025: नवरात्रीची दुसरी माळ, माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या

e-Aadhaar App: आता घरबसल्या काही मिनिटांत करता येणार आधार अपडेट; सरकार लाँच करणार नवीन अ‍ॅप

SCROLL FOR NEXT