Nagpur Crime Elder Brother Kills Younger Brother Saam Tv
महाराष्ट्र

शेतीचा वाद विकोपाला! मोठ्यानं लहान भावाला संपवलं; मृतदेह जाळून नाल्यात फेकला, नागपूर हादरलं

Elder Brother Kills Younger Brother: सख्खा भाऊ ठरला वैरी. शेतीतील वाद विकोपाला गेला. कळमेश्वर तालुक्यात लहान भावाची निर्घृण हत्या. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

नागपुरातून भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शेतीतील वाद विकोपाला गेला. याच कारणातून मोठ्या भावानं लहान भावाची निर्घृण हत्या केली. तसेच पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा भावांमध्ये विहीर, पाणी, पाइपलाइन आणि शेत रस्त्यावरून वाद सुरू होता. याच कारणातून मोठ्या भावानं छोट्या भावाची हत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अरूण तुरारे (वय वर्ष ४३) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, चंद्रशेखर तुरारे असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. याचं कुटुंब नागपुरात वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील तीन वर्षांपासून वाद सुरू होता. विहीर, पाणी, पाइपलाइन आणि शेत रस्त्यावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे.

या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. याच वादातून मोठ्या भावाने लहान भावाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला नाल्यात टाकून आरोपीनं मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. अरूण तुरारे घरी आला नसल्याने कुटुंबाने चिंता व्यक्त केली. मात्र, नाल्याजवळ मानवी हाडे जळालेल्या अवस्थेत आढळल्याने हा प्रकार उघडकीस आले.

चार दिवसांपूर्वी रस्ता वादातून भावंडांमध्ये तीव्र भांडण झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारानंतर अरूण यांची पत्नी ज्योत्स्नाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. पत्नी ज्योत्स्नाच्या तक्रारीवरून खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. दरम्यान, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून जाळले असल्याची कबुली केली. मृतकाच्या मागे पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : अटक होणार समजताच माणिकराव कोकाटेंचा BP वाढला, श्वास घेण्यास अडचण; थेट रूग्णालयात दाखल

Famous Director Son Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, लिफ्टमध्ये अडकला अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Thane Metro 4: मुहूर्त ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतची ठाणे मेट्रो 4 या दिवशी होणार सुरु; कोणत्या स्थानकावर थांबणार?

Zodiac predictions : आज घेतलेला एक निर्णय बदलू शकतो भविष्य! वाचा १८ डिसेंबरचं सविस्तर पंचांग

SCROLL FOR NEXT