Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: लग्नाला जाणं पडलं महागात; घरी परतल्यावर दार उघडताच काळजात भरली धडकी

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Theft News: नागपूर येथून चोरीची मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण कुटुंब शेजारच्या व्यक्तीच्या लग्नात गेले असताना चोरट्यांनी घर साफ केलं आहे. या घटनेत तब्बल २२ लाखांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली आहे. मोठ्या चलाखीने चोरट्यांनी काही मिनीटांतच ही चोरी केली आहे. पोलीस सध्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारच्या मुलाच्या लग्नाला जाणे नागपुरातील एका कुटुंबाला महागत पडलं आहे. लग्न सोहळ्याला घराला कुलूप लावून गेलेल्या सेवानिवृत्त दांपत्याच्या घरी अवघ्या 50 मिनिटात 22 लाखांची चोरी झालीये. चोरट्यांनी लाखोचे दागिने उडवल्याची ही घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत सूर्योदय नगरात घडली आहे.

दांपत्य लग्नावरून घरी आले तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. काहीतरी गडबड आहे असे समजून त्यांनी घाईने घरात प्रवेश केला. तेव्हा कपाटाचे दार देखील तुटले होते. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या कपाटातील सर्वच दागीने चोरीला गेले आहेत. चोरी झाल्याचे समजताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

चोरट्यांनी कुत्र्यालाही गंडवल

विशेष म्हणजे घरात पाळीव कुत्रा (Dog) असताना देखील चोरट्यांनी हाथ साफ केला आहे. घरात कुत्रा आहे हे चोरट्यांना कदाचीत माहीत असावे. त्यामुळे त्यांनी अगदी शांतपणे आणि चलाखीने चोरी केली. यावेळी शेजारील इतर व्यक्तींना देखील चोरी होत असल्याचे समजले नाही. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी २२ लाखांची चोरी (Theft) केली आहे. नागपूर हुडकेश्वर पोलीसांना या घटनेची माहिती दिली असून पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

Today's Marathi News Live: विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT