Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: पत्‍नीच्‍या चारित्र्यावर बोलल्‍याने झाला वाद; गोळ्या झाडून केली हत्या

पत्‍नीच्‍या चारित्र्यावर बोलल्‍याने झाला वाद; गोळ्या झाडून केली हत्या

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्णनगरात गोळ्या झाडून एकाची हत्या (Crime News) करण्यात आली. पत्नीच्या चारित्र्यबद्दल बोलल्याने झालेल्या वादातून आरोपीने तीन ते चार साथीदारांच्या मदतीने अविनाश अशोक घुमडेवर दोन गोळ्या झाडून हत्या केली. रात्री ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

अविनाश अशोक घुमडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे. मात्र आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यबद्दल बोलल्याने झालेल्या वादातून आरोपीने तीन ते चार साथीदारांच्या मदतीने अविनाश घुमडेवर दोन गोळ्या झाडून हत्या केली.

नऊ दिवसात चार हत्‍या

घटेनची माहिती समजताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच सदर घटनेचा तपास सुरू केला आहे. नागपुरात नवीन वर्षाच्या 9 दिवसात चार हत्येच्या घटना घडल्या. त्यामुळे नवीन वर्षात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT