Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: भांडणाच्या सेटलमेंटसाठी बोलवलं अन् तिथेच संपवलं, जुन्या वादातून अल्पवयीन मुलांकडून एकाची हत्या

Crime News: ७ अल्पवयीन मुलांनी मिळून एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News:

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील मोठ मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात नागपूरमधून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ७ अल्पवयीन मुलांनी मिळून एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. या घटनेमुळे नागपूरात खळबळ पसरली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सक्षम तिनकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नागपूर जिल्ह्याच्या डोंगरगाव परिसरात ही थरारक घटना घडलीये. मुलांमध्ये अंतर्गत वाद होता, समझोता करण्यासाठी एकत्र जमले आणि हत्या झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव परिसरात घटना घडली असून आरोपी सौरभ उर्फ बादशाह आणि त्याच्या सात अल्पवयीन साथीदारांनी मिळून ही हत्या केली आहे. या मुलांमध्ये बऱ्याच दिवसांपासून एक जूना वाद होता. सेटलमेंट करू असं सांगत त्यांनी सक्षमला एका अज्ञात ठिकाणी बोलावलं. पुढे वाद विकोपाला गेला आणि मुलांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सक्षमची हत्या झाली आहे.

१० वीतील मुलांचे भयंकर कृत्य

पश्चिम बंगालमधून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. महागडा मोबाईल, स्मार्ट वॉच आणि लॅपटॉप खरेदी करण्यासाठी १० वीतल्या विद्यार्थ्याने मित्राचे अपहरण करत त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

Investment Tips: फक्त १००० रूपयांची गुंतवणूक करा अन् लखपती व्हा, कसं ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT