Jalna Crime News: व्यापाऱ्याकडून जनावरांना तंदुरुस्त बनविण्यासाठी अजब फंडा, पोलिसांच्या धाडीनंतर धक्कादायक कारनामा उघड

Jalna Crime News: जनावरांना तंदुरुस्त बनवण्यासाठी आपल्या शेतातील पपईच्या बागेत चक्क गांजाची लागवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Jalna Crime News:
Jalna Crime News:Saam tv
Published On

Jalna crime News In Marathi:

जालन्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालन्यातील एका व्यापाऱ्याने जनावरांना तंदुरुस्त बनवण्यासाठी आपल्या शेतातील पपईच्या बागेत चक्क गांजाची लागवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीनंतर ही घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घनसावंगी तालुक्यातील राहेरा गावातील मुक्या जनावराचा व्यवसाय करणाऱ्या धोंडगे या व्यापाऱ्याच्या शेतात धाड टाकली.

या व्यापाराच्या शेतातील पपईच्या बागेत गांजाची दोन मोठे झाडे आढळून आली. तसेच जनावरांच्या गोठ्यावर वाळू घातलेला गांजाही आढळून आला आहे.

Jalna Crime News:
Navi Mumbai Crime News: वाशीमध्ये १५ वर्षांच्या मुलावर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचार, घटनेने नवी मुंबई हादरली

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पथकाने धाड टाकल्यानंतर जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गांजाची लागवड मुक्या जनावराला खुराक म्हणून केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मुक्या जनावरांना गांजाचा डोस दिल्यानंतर जनावरे जास्त प्रमाणात चारा खातात. त्यानंतर त्या सुदृढ आणि तंदुरुस्त होतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीतून मोठा नफा मिळतो. त्यामुळे गांजाची लागवड केली असल्याची माहिती या व्यापाऱ्याने राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलिसांनी धाडीत अंदाजे पंधरा किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारात दोन लाख रुपये किंमत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी व्यापाऱ्याविरुद्ध अवैधरित्या विनापरवाना शेती गांजाची लागवड केल्याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलमाअतंर्गत गुन्हा केला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Jalna Crime News:
Rajasthan Crime News: राजस्थानच्या 'कोटा'त लातूरच्या तरुणाची आत्महत्या, २४ तासात २ विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं

दरम्यान, राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या धाडीनंतर या कारवाईची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. या कारवाईदरम्यान, या पथकाने मोठी गुप्तता पाळली होती. सकाळी केलेल्या कारवाईची माहिती संध्याकाळी उशिरा समोर आल्याने अनेकजणांकडून सोशल मीडियावर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com