Nagpur Crime
Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: भर रस्त्यात लुट; 20 लाख रुपये असलेली बॅग लांबविली

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली उड्डाणपुलावर पैश्याची बॅग घेऊन जाणाऱ्या (Nagpur) व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला तीन इसमांनी लुटले. या बॅगेत 20 लाख रुपये होते. (Nagpur Crime News)

नागपूरच्या यशोधरा (Police) पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली उड्डाणपुलावर पैश्याची बॅग घेऊन जाणाऱ्या मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला 3 इसमांनी लुटले. हा कर्मचारी आपल्या दुचाकीने कळमना मार्केटवरून जरीपटका येथे जात असता पाऊस (Rain) आल्यामुळे चिखली उड्डाणपुलावर रेनकोट घालण्यासाठी थांबला. याच वेळी तीन अनोळखी इसमांनी या कर्मचाऱ्याला अडवून दमदाटी करून त्याच्याकडे असलेली व्यापाऱ्यांची 20 लाख रुपये असलेली बेग घेवून पसार झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे.

रक्कमेबाबत काही व्यक्तिनाच माहिती

या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. इतकी मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती फक्त काही लोकांनाच होती. त्यामुळे पहानीतील व्यक्तीच्या माहितीवरून ही लूट झाली असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. पोलीस त्या दिशेने देखील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये रंगणार काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : सत्तेतून पैसे आणि पैश्यातून सत्ता, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँगेसवर आरोप

Dhule News : उपमुख्यमंत्री फडणवीसांना कोळी समाजाने दाखविले काळे झेंडे; १० वर्षानंतरही आश्वासन पूर्तता न केल्याने केला निषेध

Nail Astrology: नखांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव

Mumbai Crime: ४० वर्षांनंतर ७० व्या वर्षी दाऊदला पकडलं! १९८४ साली केलेल्या अक्षम्य 'पापा'चे घडे भरले!

SCROLL FOR NEXT