Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime : नागपुरात थरार! घटस्फोटाचा निकाल लागताच २४ वर्षीय तरुणीची हत्या; भररस्त्यात गळा, पोटावर सपासप वार

Nagpur Crime News : न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी २४ वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या पतीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी एका २४ वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा थरार घडला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंजू संदीप पचारे (वय २४, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत मंजूच्या वडिलांनी आपल्या जावयावरच हत्येचा संशय व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिलेचा मोबाईल घेऊन फरार झाला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

लग्नानंतर दोन वर्षांतच संसाराला तडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप दारूच्या नशेत मंजूला वारंवार मारहाण करायचा. पतीच्या छळाला कंटाळून मंजूने त्याचे घर सोडले आणि ती कामठी येथील वारीसपुरा भागात राहणारे तिचे वडील राजकुमार पारसे यांच्याकडे राहू लागली होती.

न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी घात

मंजूने पती संदीप विरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल २५ जून २०२६ रोजी लागला होता. निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मंजू शेतातून काम करून घरी आली. वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती.

गळ्यावर आणि पोटावर सपासप वार

मंजू हिरणवार गल्लीतून जात असताना, सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपीने तिच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने मंजूच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच, आरोपी तिचा मोबाईल फोन घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुनी कामठी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT