Nagpur Corona Update: नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. नागपुरात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. आज नागपूर शहरात 329 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आलीये. मंगळवारी (4 जानेवारी) 192 नवे कोरोना रुग्ण आढळले होते (Nagpur Corona Update 329 New Corona Patients Found In Last 24 Hours).
नागपुरात एका दिवसात 137 ने रुग्णवाढ झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलीये. 1 जानेवारीपासून कोरोना (Corona) बाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. 3 जानेवारीला 133 नवे कोरोना रुग्ण आढळून आळे होते. तर मंगळवारी 192 बाधितांची नोंद करण्यात आली. मात्र, अचानक संख्या वाढून 329 वर गेल्यानं नागपूरकरांनी जबाबदारीनं वागण्याची गरज आहे.
देशात 24 तासात 58,097 जणांना कोरोना
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मंगळवारी मोठी वाढ झाली. एका दिवसामध्ये 58 हजार 97 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांची संख्याही दिवसभरात वाढली आहे. मंगळवारी दीडशेपेक्षा कमी असणारी मृत्यूची संख्या अचानकच 534 वर येऊन पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये 15 हजार 389 जण कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Health) दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. देशामध्ये सध्या 2 लाख 14 हजार 4 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 82 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासामध्ये 15 हजार 398 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशामध्ये 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.