Nagpur Crime: WhatsApp स्टेटस ठेवण्यावरुन राडा; लग्नाच्या वरातीत गोळीबार  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: WhatsApp स्टेटस ठेवण्यावरुन राडा; लग्नाच्या वरातीत गोळीबार

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आता वादाचे कारण देखील ठरले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हा जवळपास सर्वत्र स्मार्टफोनमध्ये बघायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस खूपजण मोठ्या आवडीने ठेवत असतात. मात्र, हेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp status) आता वादाचे कारण देखील ठरले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादात नागपुरमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये गोळीबार (Firing ) झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना नागपूर (Nagpur) यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोहमद रफिक चौकात आहे. (Nagpur Confusion Firing wedding party over keeping WhatsApp status)

हे देखील पहा-

शाहबाज खान याने व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपी समीरचा फोटो असलेल्या स्टेटसवर (status) कमेंट केले होते. यावर समीर नाराज झाला होता. त्याने शहाबाज खान याला फोन केला असता शहाबाज ने "मै यहा का बादशाह हु और अभी बारात में हु" म्हणत फोन कट केला होता. यामुळे चिडलेल्या समीर आपल्या साथीदाराना घेऊन लग्नाच्या वरातीमध्ये पोहोचला. यावेळी समीरने हवेत गोळीबार (Firing) करत वरात थांबवली. यावेळी शहाबाज याने तिथून पळ काढला. मात्र, वरात का थांबले म्हणून नवरदेवाचा भाऊ विचारायला आला. यावेळी त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल १० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या मोहम्मद रफीक चौक पाचपावली येथे वरात जात होती. या ठिकाणाहून वरात जात असताना ६ जण या ठिकाणी आले होते. त्यांचा शाहबाज खान याच्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरुन काही वाद होता. या ६ जणांनी शाहबाज याला शोधण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी वाद सुरू झाला आहे. यानंतर वऱ्हाड्याबरोबर हाणामारी सुरू झाली यावेळी ६ आरोपींनी हवेत २ राऊंड फायर केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ ३ पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व आरोपींना ४ तासामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २ बाईक, चाकू, पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला; मिळणार ३ महिन्यांचा एरियर; ₹१८००० ते १.५ लाखांपर्यंतचे कॅल्क्युलेशन वाचा

High Blood Pressure: तिशीतल्या तरुणांमध्ये वाढतोय BPचा त्रास अन् वयाच्या पन्नाशीत येतो हार्ट अटॅक, संशोधनातून डॉक्टरांनी केलं स्पष्ट, वाचा कारणं

Kidney Stone Food Tips: किडनी स्टोन झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये?

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलते ठरली 'बिग बॉस मराठी ६'ची विजेता; रितेश भाऊंनी ट्रॉफीसोबत दिली 'ही' खास भेटवस्तू | VIDEO

SCROLL FOR NEXT