Nagpur Butibori MIDC tank collapse Saam TV marathi News
महाराष्ट्र

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

Nagpur MIDC tank collapse news : नागपूरच्या बुट्टीबोरी MIDC मधील अवाडा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळून ३ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण मलब्याखाली अडकल्याची भीती आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Butibori MIDC tank collapse : उपराजाधानी नागपूरमधील MIDC मध्ये मोठी दुर्घटना झाली. निर्माणाधीन टाकी कोसळल्यामुळे अनेकजण दबले गेलेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ८ जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. टाकीच्या मलब्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली. पाण्याची टाकी कशी कोसळली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस अन् बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

नागपूरमधील बुट्टीबोरी एमआयडीसीमधील अवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी आज सकाळी ११ वाजता कोसळली. अनेकजण यावेळी काम करत होते, त्यावेळी अचानक टाकी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांना बाहेर काढण्यात आलेय. त्यांच्यावर जवळच्या रूग्णलायात उपचार सुरू आहेत. टाकीच्या मलब्याखाली काही कामगार आणखी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या ठिकाणी बचावकार्य वेगात केले जात आहे.

नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुट्टीबोरी येथील अवाडा ही सोलर पॅनल तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये एक टाकी तयार करण्यात येत होती. याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले होते. पण आज सकाळी ११ वाजता टाकी कोसळली अन् अनेकजण मलब्याखाली दबले गेले. दुर्घटनेचे व्हिडिओ अन् फोटो पाहून मृताची आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अवाडा कंपनीत दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून दबलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण मलब्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वॉटर प्रेशरमुळे टाकी कोसळल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर गव्हाची चपाती खाल्लीच नाही तर? शरीरात दिसतील 5 मोठे बदल

Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

Maharashtra Live News Update : MIM च्या सहर शेख यांना पोलिसांची समज

Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

Bigg Boss Marathi 6 : तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी; रुचितानं केली बोलती बंद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT