Sunil Kedar Latest News Saam TV
महाराष्ट्र

Sunil Kedar News: सुनील केदार यांना मोठा झटका; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Nagpur Bank Scam: सुनील केदार यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३० डिसेंबर २०२३

Sunil Kedar Breaking News:

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाने सुनावलेली ५ वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात शिक्षा निलंबित करून जामीन मिळावा आणि दोषसिद्धी स्थगिती निर्णयावर आज निकाल लागला. मात्र या प्रकरणात सुनील केदार यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणांमध्ये सुनील केदार (Sunil Kedar) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी यांचा जामीन आणि दोष सिद्धीला जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी नकार दिला आहे.

हा गंभीर स्वरूपाचा घोटाळा असून यामध्ये जामीन देणे हे चुकीचं ठरेल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 53 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. यासह कागदपत्र पुरावे स्वरूपात जोडण्यात आले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच या घोटाळ्यात गरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षेला जामीन दिल्यास किंवा स्टे दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असेही न्यायालयाने म्हणले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, याआधी न्यायालयाने सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली होती. केदार यांना अपात्रतेची कारवाई रद्द करण्यासाठी दोषसिद्धीवर स्थगिती मिळविणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना पुन्हा मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता सुनिल केदार यांना हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र केसरी स्थगित करण्यासाठी पुणे न्यायालयात दावा दाखल

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

SCROLL FOR NEXT