Nagpur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात! दुचाकी पुलावर अन् तरुण ५० फूट खाली कोसळला; जागीच जीव गेला

Nagpur Latest News: नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाण पुलावर आज दुपारी ही दुर्घटना घडली.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १३ जुलै २०२४

नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाण पुलावर आज दुपारी ही दुर्घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून उड्डाण पुलावर सुरक्षा भिंत नसल्याने या दुर्घटना घडत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाण पुलावर आज दुपारी ही घटना घडली. बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात होता. यावेळी तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळला. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तरुणाला उचलून जवळच्या भवानी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, अश्या पद्धतीच्या घटना घडत असल्यानं उड्डाणपुलावरून ट्रॅफिक पासून दिलासा मिळाला तरी उड्डाणपुलावर सुरक्षा भिंत नसल्यानं जीवघेणे ठरत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT