Nagpur BJP Women Leader Sana Khan Murder Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: मित्राला भेटायला गेली अन् घात झाला; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत घडली भयानक घटना

Sana Khan Murder: सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur BJP Women Leader Murder: भाजपची नागपूर शहरातील महिला पदाधिकारी सना खान हिची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची कबुली नागपूर (Nagpur) पोलिसांना दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सना खान १ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मित्र अमित उर्फ पप्पू साहू याला भेटायला गेली होती. अमित हा सना खानचा (Sana Khan) व्यावसायिक पार्टनर असल्याची माहिती आहे. जबलपूरमध्ये गेल्यानंतर सना अमितच्या घरी मुक्कामी थांबली होती.

मात्र, २ ऑगस्टपासून सना खानचा फोन लागत नसल्याने तिच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूर पोलिसांत दिली होती. दरम्यान, मानकापूर पोलिसांचे पथक सना खानचा शोध घेण्यासाठी जबलपूरला गेलं. पोलिसांनी अमित साहू याचा शोध घेतला.

मात्र, तो फरार झाला. अमित याच्या नोकरांनीही तेथून पळ काढला होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक आधारे अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त सांडलेले होते.

ते रक्ताने माखलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून तपास सुरू आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येची बातमी कळताच नागपुरात खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT