फॅशन डिजाईन  मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपुरातल्या फॅशन डिझायनरला खंडणी प्रकरणी अटक !

एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू ! असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी Ransom धमकविण्याचा गंभीर प्रकार नागपुरात घडला आहे. नागपूरच्या बेलतारोडी पोलिसांनी Police या प्रकरणाचा छडा लावला आहे. फॅशन डिझायनर असलेल्या 45 वर्षीय शीतल इटनकर या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. Nagpur-based fashion designer arrested in ransom case

आरोपी शीतलला बुटीक सुरू करायचे होते. मात्र, पतीने पैसे देण्यास नकार दिला होता. या दरम्यान या दाम्पत्याला कोरोनाची Corona लग्न झाली आणि कोरोना उपचारासाठी २०२० मध्ये इटनकर दांपत्य डॉक्टर तुषार पांडे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी होते. पांडे दाम्पत्यांच्या प्रॅक्टिस वरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शितलला आला होता. या डोकरांची माहिती काढण्यास शीतलने सुरुवात केली. यातून त्यांना दोन मुले असल्याचे फेसबुक Facebook अकाउंट वरून तिने शोधले होते.

त्यामुळे त्या मुलांचे अपहरण करून मोठी रक्कम मिळावीण्याची योजना तिने आखली. त्यानुसार कुरियर च्या माध्यमातून तिने धमकी पत्र पाठवले. या पत्रामध्ये तिने दोन्ही मुलांच्या बदल्यात ५०-५० लाख रुपयांची मागणी केली होती.

ही रक्कम नरेंद्र नगरातील एका निर्जन ठिकाणी ठेवण्याची सूचना तिने पत्राद्वारे केली होती. असे न केल्यास मुलांची हत्या करण्याची धमकी ही तिने त्या पत्रात दिली होती. डॉक्टर पांडे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पत्राचा धागा पकडून शोध सुरू केला. ज्या केअर सेंटर वरून हे पत्र आले होते त्या सेंटर मधून पाठविण्यात आलेल्या सर्व ग्राहकांचे पत्ते मिळवून पोलिसांनी प्रत्येक ग्राहकांकडे चौकशी केली.

हे देखील पहा -

शितलने नाव आणि पत्ता खोटा दिल्याने पोलिस तिच्यापर्यंत पोहोचु शकले नाही. मात्र परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासणी करून एक महिला संशयास्पद दिसली. त्यामुळेच या क्रमांकावरून पोलिसांनी त्या महिलेचे नाव आणि ती राहत असलेले ठिकाण शोधले. त्यानंतर शीतलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला. Nagpur-based fashion designer arrested in ransom case

सुखवस्तू कुटुंबातील असूनही अधिक पैसा मिळावा आणि अति महत्वकांशा असल्याने तिने हा गुन्ह्याचा अविचारी मार्ग स्वीकारल्याचं तपासात पुढे आले आहे. पोलिस या प्रकरणाची प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

SCROLL FOR NEXT