Chandrashekhar Bawankule  
महाराष्ट्र

Nagpur Hit and Run : अपघातावेळी बावनकुळेंचा मुलगा कुठे होता? नागपूर हिट अँड रन घटनेत ट्विस्ट

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

Nagpur Audi Car Accident update : नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. महागड्या ऑडी कारच्या अपघातावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा ड्रायव्हर सीटच्या बाजूला असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलाला आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

अपघात ग्रस्त ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर नोंदणीकृत आहे. सोमवारी याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी आरोपींना सोडले जाणार नाही, गुन्हेगार कुणीही असो... कारवाई करावी, असे सांगितले होतं. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत प्रश्नांची सरबत्ती केली होती.

पोलीस उपायुक्त झोन 2 चे राहुल मदने यांनी अपघात प्रकरणावर माहिती दिली. त्यांनी नेमकं काय सांगितलं ते पाहूयात...

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट

कारचा अपघात झाला त्यावेळी कारमध्येमध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार, आणि संकेत बावनकुळे बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता.

अपघातानंतर अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. अर्जुन वाहन चालवत होता. म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते. मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली. संकेत बावनकुळे गाडीत होता. अर्जुन आणि रोनितला ताब्यात घेऊन आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहित पडलं. त्यानंतर संकेत याला चौकशीसाठी बोलवण्यात आले.

आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही

आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. या अपघाताचे Cctv डिलिट केले हे सत्य नाही. तपासात असे कुठेही आढळले नाही. सुरुवातीला जेव्हा अपघात घडला आणि दोन कार आणि एक दुचाकीला ऑडी कारची धडक बसली होती. याप्रकरणी त्या वाहनांमध्ये बसलेले तीन लोक होते, ते किरकोळ जखमी होते. त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून तातडीने त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT