Crime
Crime Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर: पत्नीचा गळफास घेत तर पतीचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न! पत्नीचा मृत्यू

मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर: कपिल नगरच्या बाबा दिपसिंग गुरूद्वारामागे पती प्रफुल सहारे आणि त्याची पत्नी रितू सहारे  आपल्या दोन मुलांसह राहत होते. मात्र आज सगळी जे घडलं ते पाहून परिसर हादरला आहे. पत्नी गळफास घेत लटकलेली तर पतीने विषारी औषध घेत, पडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघेही खोलीबाहेर न आल्याने प्रफुल्लचा भाऊ प्रशांत याला शंका आली. त्याने त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दार तोडले. यावेळी प्रफुल्ल सहारे यांच्या तोडांतून फेस येत होता. याशिवाय वहिनी रितू सहारे या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या प्रकाराने घरात एकच खळबळ उडाली. 

या सर्व घटनेची माहिती कपिलनगर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत रितू सहारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच प्रफुल्ल सहारे यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत प्राथमिक चौकशी केली असता, आज सकाळी दोघांमध्ये काही कारणाने भांडण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातून प्रफुल्लने त्याच्या पत्नीची हत्या करीत स्वतः विष प्राशन केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असल्याने अद्याप कोणते कारण आहे हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

हे देखील पाहा-

पती पत्नीने आत्महत्या केली? की तो घातपात आहे याचा खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्ट नंतर आणि पतीला शुद्ध आल्यानंतरच होऊ शकेल, मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT