नांदेड: सायकलवर फिरवण्याच्या बहाण्याने 7 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य!

भोकर तालुक्यातील एका गावातील ही घटना काल घडलीय.
Arrest
ArrestSaam Tv

संतोष जोशी

नांदेड: दोन जणांनी अंगणात खेळत असलेल्या एका सात वर्षाच्या मुलाला 'तुला सायकल वर फिरवतो' म्हणून शेतात नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडलीय. भोकर तालुक्यातील एका गावातील ही घटना काल घडलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैसर्गिक अत्याचार करणारे दोघेही 16 वर्षाचे अल्पवयीन आहेत. यानंतर मुलाने आपल्या सोबत घडलेला प्रसंग आपल्या आईला सांगितला. आईने तातडीने पोलिस ठाणे गाठून मुलाचे लैंगिक शोषण प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com