Nagpur-Amravati Highway Shivshahi Bus Fire : गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगली आणि नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, आता नागपूरमध्ये धावत्या शिवसाही बसला भीषण आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. (Latest Marathi News)
या बसमधून १६ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking Marathi News)
नागपूर-अमरावती (Amravati) महामार्गावरील कोंढाळीजवळ असलेल्या साईबाबा मंदीर परिसरात मंगळवारी पहाटे ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस गणेशपेठ आगारातून निघाली होती. नेहमीप्रमाणे काही प्रवासी बसमध्ये चढले.
दरम्यान, शिवशाही बस (Shivshahi Bus) महामार्गावरून धावत असताना बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिले. सतर्कता म्हणून चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि प्रवाशांना सावध केले. दिसल्यानंतर त्याने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टर व प्रवाशांना सावध केले. सूचना मिळताच सर्व प्रवासी वेळेवर सामान घेऊन बसमधून बाहेर पडले.
काही क्षणातच बसमधून आणखीनच धूर निघू लागला आणि आगीने उग्र रूप धारण केलं. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह कोंढाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने पुढे पाठवण्यात आले.आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.