भाजप - Saam TV
महाराष्ट्र

Nagpur : विधान परिषदेनंतर भाजपचे आता 'मिशन महापालिका'

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूरात (Nagpur) भाजपनं विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळविलाय. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. विधान परिषदेनंतर आता भाजपनं 'मिशन महापालिका' हाती घेतलंय. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं पुन्हा महापालिकेत झेंडा फडकविण्याचा निर्धार केलाय.

हे देखील पहा :

विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दणदणीत विजय मिळविला. पदवीधर निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हा विजय भाजपला समाधान देणारा होता. या विजयानंतर मात्र आता भाजपचं (BJP) लक्ष्य नागपूर महापालिका निवडणूक असणार आहे. नागपूर महापालिकेत भाजप गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे. आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनं 'मिशन महापालिका' हाती घेतलंय. त्यासाठी जोरदार तयारी सुरू केलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीत (Election) मिळालेल्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय.

त्यामुळं पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. काही भाजप नगरसेवकांची निष्क्रियता आणि अँटी इन्कमबन्सी यामुळं शहरात नागरिक काहीसे नाराज आहे. त्यामुळं भाजपसाठी आगामी महापालिका (Muncipal Corporation) निवडणुक कठीण जाणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, विधान परिषद निवडणुकीतील विजयानं भाजपचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्यांना याचा फायदाही होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

SCROLL FOR NEXT