Nagpur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: भरधाव ट्रकने २६ वर्षीय तरूणीला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हायरल

Truck Crushed 26 Year Old Woman CCTV Viral: नागपूरमध्ये एका २६ वर्षीय तरूणीला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये बँकेची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या २६ वर्षीय तरूणीचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रियंका मानकर, असं या मृत तरूणीचं नाव आहे. आता या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. हा अपघात ३ जुलै रोजी झाला होता. सीसीटीव्हीमध्ये तरूणी ट्रकच्या चाकाखाली आल्याचं दिसत आहे, सध्या हा सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कसा झाला अपघात?

प्रियंका मानकर नावाची तरूणी भावासोबत दुचाकीवरून जात होती. तेव्हा समोरून येणाऱ्या वाहनामुळे त्यांच्या दुचाकीचं नियंत्रण बिघडलं. त्यामुळे दुचाकी पडली. रस्त्यावर पडल्यामुळे ही तरूणी ट्रकच्या चाकाखाली आली होती. प्रियंकाचा भाऊ योगेश हा दुचाकी चालवत होता. या अपघातात महिलेला रुग्णलयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं सांगितलं. या अपघातात प्रियंकाचा भाऊ देखील जखमी झालाय, सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू (Nagpur Accident News) आहेत.

अपघाताचा CCTV व्हायरल

बेलतरोडी पोलिसांनी ट्रॅक चालकाला अटक करत गुन्हा दाखल (Nagpur News) केलाय. सध्या त्याला कोर्टातून जामीन मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरूणी ट्रकच्या चाकाखाली आल्याचं दिसत आहे. ही तरूणी परीक्षा देण्यासाठी चालली असल्याची माहिती मिळतेय. बेलतरोडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. हा धक्कादायक अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आलाय.

छत्रपती संभाजीनगरमधील अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड भराडी रस्त्यावरील बोरगावजवळ दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात (Accident News) झालाय. या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलंय. गणेश निकम आणि आशिष परमेश्वर नावाच्या तरूणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. ४ ऑगस्ट रोजी हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT