Nagpur Latest News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Accident: हृदयद्रावक! डंपरच्या धडकेत बहिण- भावाचा मृत्यू; नागपुरातील घटना

Nagpur Latest News: अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Gangappa Pujari

पराग ढाकणे, नागपूर|ता. २९ डिसेंबर २०२३

Nagpur Breaking News:

नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरच्या बिडगाव परिसरात भरधाव ट्रकने भाऊ बहिणीला धडक दिली. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (२९, डिसेंबर) सकाळी नागपूरमधील (Nagpur) बिडगाव परिसरात कचरा घेऊन डंपरने बहिण भावाला चिरडल्याची घटना घडली. शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

सुमित सैनी (वय, १८) अंजली (वय, १६) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघाताची (Accident) माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट डंपरला आग लावली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अंजली ही एका कॅफेत काम करत होती तर भाऊ सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता. भीषण अपघातात बहिण- भाऊ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट...

Krushna Abhishek: अभिषेक बच्चनमुळे या कॉमेडियनने बदलले नाव; अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला मोठा खुलासा

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT