Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : दवाखान्यात जात असताना पती- पत्नीवर काळाची झडप; विरुद्ध दिशेने आलेल्या मालवाहू वाहनाची धडक

Nagpur News : दाम्पत्य डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सावनेर येथे रुग्णालयात जात होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या तेलकामठी शिवारातील वळण रस्त्यावर भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: रुग्णालयात नेत्र तपासणीसाठी जात असताना पती- पत्नीवर काळाने झडप घातली आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या छोट्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सावनेर-काटोल मार्गावरील तेलकामठी शिवारातील वळण रस्त्यावर घडली आहे. 

नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील नांदिखेडा येथील राजकुमार जंगलू कुंभारे (वय ५०) व इंदू राजकुमार कुंभारे (वय ४७) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सदर अपघात ८ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. कुंभारे दाम्पत्य डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सावनेर येथे रुग्णालयात जात होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या तेलकामठी शिवारातील वळण रस्त्यावर भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. 

भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दिली धडक 

कुंभारे दाम्पत्य दुचाकीने जात असताना सावनेरहून काटोलकडे विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दोघेजण रस्त्यावर फेकले गेले होते. यात गंभीर दुखापत झाल्याने राजकुमार कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी इंदुबाई या गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही तासातच त्यांचा देखील मृत्यू झाला. 

वाहन चालक ताब्यात 
दरम्यान मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचा मालवाहू वाहनावरील ताबा सुटला. यानंतर ते वाहन रोडलगत उलटले. यात वाहनाचा चालक देखील किरकोळ जखमी झाला होता. उपचारानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र सावनेर- काटोल मार्गाचा काही भाग अरुंद आहे. दोन्ही बाजूंनी झुडपे असल्याने या मार्गावरील काही वळण धोकादायक ठरत असल्याचे सांगितले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करू नका, होईल मोठं नुकसान

Makar Sankranti 2026: मकरसंक्रातीला खिचडी दान केल्याने काय होतं?

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT