Summary -
नागपूरच्या रिझर्व्ह बँक चौकात भीषण अपघात
भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू
अपघातामध्ये मुलांचा काका गंभीर जखमी झाला
मुलं लग्नावरून गावी परतत असताना हा अपघात झाला
नागपुरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना नागपुरच्या रिझर्व्ह बँकेच्या चौकात घडली. दोघेही काकांसोबत दुचाकीवरून जात होते. भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये भावाचा जागीच मृत्यू झाला तर बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिझर्व्ह चौकात बुधवारी भयंकर अपघात झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू झाला. रुद्र सुनील सिंगलधुपे (११ वर्षे) आणि सिमरन सुनील सिंगलधुपे (१२ वर्षे) अशी मृत बहीण-भावाची नावं आहेत. दोन्ही मुलं हे नातेवाईक शेषनाथसिंग जागेश्वरसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. रिझर्व्ह बँक चौकात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर रुद्र आणि सिमरन खाली पडले. ट्रकचे चाक रुद्रच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सिमरनचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये जागेश्वरसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. ते काठीवरून लग्न आटोपून मकरढोकड्याला गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात केला. या अपघाताचा तपास नागपूर सदर पोलिस करत आहेत.
या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. रिझर्व्ह बँक चौक, झीरो माइल चौकात नेहमीच अपघाताचा धोका असतो. विशेषतः रात्रीच्या सुमारास अवजड वाहने वेगात येतात आणि सिग्नल तोडून निघतात याकडे ट्राफिक पोलिसांचे लक्ष नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.