Nagpur Animal Attack On 8 Month Old Girl Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : झोपेत आईच्या कुशीतून उचलले, छाती आणि दोन्ही हात खाल्ले; नागपुरात प्राण्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

Nagpur Animal Attack On 8 Month Old Girl : नागपूरमध्ये ८ महिन्यांच्या बळावर अज्ञात प्राण्याने हल्ला केला आहे. आईच्या कुशीतून उचलून नेत प्राण्याने हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. य घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरच्या नरसाळा भागात मध्यरात्री अज्ञात प्राण्याचा हल्ला

  • ८ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

  • हल्ला करणारा प्राणी अद्याप अज्ञात

  • परिसरात भीतीचे वातावरण

पराग ढोबळे, नागपूर

महाराष्ट्रभर बिबट्याची दहशत असून बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. आईच्या कुशीत असलेल्या तब्बल ८ महिन्यांच्या चिमुकलीला प्राण्याने आपले भक्ष बनवले. या प्राण्याने चिमुरडीवर हल्ला केला या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा भागात घडली आहे. या भागात बाहेरगावातून आलेल्या मजुरांची वस्ती, ठेकेदाराच्या कामासाठी आलेले मजूर कुटुंबासह झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. स्मशान घाटाजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टी वस्तीतील एका झोपडीत मूळचे मध्यप्रदेश मधील असलेले कुटुंब राहत होते.

ते मजुरीसाठी या गावात आले होते. काल मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ८ महिन्याची चिमुकली आणि तिची आई झोपली होती. यादरम्यान एका प्राण्याने तिला उचलून नेलं आणि तिच्यावर हल्ला करत तिच्या शरीराचे लचके तोडले, छाती आणि दोन्ही हात प्राण्याने खाल्ले. घरात मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधा शोध केली.

झोपडी पासून थोड्या अंतरावर छिन्न अवस्थेत चिमुकलीचे शव आढळले. या भागात मोठ्या प्रमाणात अंधार आहे, त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यात हा नेमका प्राणी कोण होता याचाही अद्याप शोध लागलेला नाही. वनविभाग आणि पोलीस याचा सविस्तर तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातवरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस धुताना शॅम्पू एकदा लावावा की दोनदा, जाणून घ्या ही सिक्रेट टिप

Accident News : अकोल्यात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने तीन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं, मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्यावर एक मोठी जबाबदारी; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Skin Care Routine For Dry Skin: ड्राय त्वचेवर नॅचरल ग्लो आणण्यासाठी परफेक्ट रूटीन काय?

Crime News: सैतान काका! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळला; सात तुकडे करत मृतदेह शेतात पुरला

SCROLL FOR NEXT