पराग ढोबळे, साम टीव्ही
वैद्यकीय क्षेत्रात नागपुरातील रुग्णासोबत आशादायक घटना घडली. मूळच्या राजस्थानमधील एका 40 वर्षीय रुग्णाचे 8 वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग काढून टाकले होते. याच रुग्णाला नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात प्लस्टिक सर्जनच्या चमूने कृत्रिम लिंग तयार केले. साडे 9 तास जटिल शस्त्रक्रिया करत त्याला पूर्ववत करण्यात आले.
लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग ( मूत्रमार्गाची ) नळी पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर लिंगाला रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे. एक कार्यशील अवयव निर्माण करण्यास सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश शस्त्रक्रियेमध्ये करण्यात आला. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी सुमारे साडे 9 तास लागले.
"मायक्रोव्हस्क्युलर" शस्त्रक्रिया म्हणजे ही मुख्यतः शरीरात ज्या रक्तवाहिन्य सूक्ष्म असतात. या रक्तवाहिन्यांना विशेष उपकरणांचा मदतीने पुनर्रचनात्मक करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. या विशेष शस्त्रक्रियेत शरीराच्या कुठल्याही भागातील टिशू किंवा हाड हे दुसऱ्या भागावर लावले जाते. या ऑपरेशनदरम्यान निकामी भागामध्ये रक्तपुरवठा पुर्ववत करण्यासाठी छोट्या, सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडल जाते. त्यामुळे अवयव आणि त्याची कार्यक्षमता रचना पूर्ववत केली जाते.
सूक्ष्म रक्तवाहिन्या योग्यरीत्या जोडल्या गेल्यास शरीरातील निकामी झालेले अवयव पूर्वीप्रमाणे कार्य करू शकते. महत्त्वाचे म्हणजे तोंडाचे कर्करोग किंवा इतर शस्त्रक्रियेत मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया ही अत्यंत प्रभावी ठरते. मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रियेचा उपयोय आता प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया,न्यूरोसर्जरी यासोबतच दंत शस्त्रक्रियेमध्ये केला जातो. याच संकल्पनेतून जटिल शस्त्रक्रिया करत लिंग पूर्ववत करण्यात आल्याचा दावा वैदकीय चमूने केला आहे.
जटिल शस्त्रक्रिया करताना अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोपजी गरज असते... यामुळे कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया व ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन, लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.
लता मंगेशकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी ऑपरेशनमध्ये सहभागी डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक केले.प्लास्टिक सर्जरी विभागचे वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले आहे.डॉ. जितेंद्र मेहता,डॉ.समीर महाकाळकर,डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक, उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.