nageshwar temple aawas 
महाराष्ट्र

नागेश्वराचा उत्सव दिमाखात; गण खेळाचा आनंद भाविकांनी लुटला

कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने यात्रा रद्द करण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

अलिबाग : कार्तिकी एकादशी झाल्यानंतर अलिबाग येथील आवास गावातील प्रसिद्ध पुरातन श्री नागेश्वराचा उत्सव साजरा होतो. आज (बुधवार) नागेश्वर उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरी भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. नागेश्वर मंदिरात रात्री गण खेळण्याची परंपरा आजही सुरू आहे. नागेश्वर उत्सव असल्याने भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी झाली आहे. नागेश्वराचा गण खेळ पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागेश्वर यात्रेत दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने व्यवसायिकांना फटका बसला आहे. nageshwar utsav in alibag

अलिबाग तालुक्यातील आवास गावात पुरातन श्री नागोबा मंदिर आहे. कोणे एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. सकाळी समुद्रस्नान घ्यायचे, मग आवासच्या वक्रतुंड विनायकाचे दर्शन घेऊन कनकेश्वराच्या दर्शनाला जायचे आणि मग रात्री मुक्कामाला आवास गावात परतायचे अशा नेमाने त्यांनी आयुष्य जगले. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात त्यांची पूजा केली जाऊ लागली. तेच हे नागोबा देवस्थान.

नागेश्वर यात्रेच्या आधी दोन दिवस उत्सव सुरू होतो. यावेळी नागेश्वरासमोर गण खेळले जातात. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असतो. बसलेले गण त्याचबरोबर इतर गण खेळले जातात. यामध्ये परंपरेने सुरू असलेल्या गण खेळात आता तिसरी ते चाैथी पिढी सहभागी होत आहे. प्रत्येक गण हा नागेश्वराला पेरकूट, नारळ, सुपारी, केवडा अर्पण करतात. तर एक गण हा मंदिरात नवसाच्या लावलेल्या शेकडो घंटा वेताच्या छडीने वाजवतो. गणाचा हा खेळ तीन दिवस रात्री खेळला जातो. हा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. यावर्षी कोरोना संकट कमी झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने यात्रा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने नागेश्वराचा तीन दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Chapati Recipe : पावसाळ्यात चपाती थंड झाल्यावर कडक होते? फॉलो करा 'ही' रेसिपी, मिळतील मऊ-लुसलुशीत पोळ्या

Sleep deprivation effects: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, ४ कारण हादरवणारं

SCROLL FOR NEXT