Nagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Petrol Pump मॅनेजरला युवकानं भाेसकलं, हत्येप्रकरणी दाेघे पाेलिसांच्या ताब्यात (पाहा व्हिडिओ)

Nagar Crime News : पाेलिस तिस-या संशयितांचा शाेध घेताहेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar Crime News : नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातनंतर युवकाने पंपावरील मॅनेजरचा खून केला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरूवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गुरुराज पेट्रोल पंपावर खूनाची घटना घडली. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन युवकांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

हा वाद सोडवण्यासाठी मॅनेजर घटनास्थळी पाेहचली. त्यावेळी संशयितांनी मॅनेजरशी वाद घातला. त्यावेळी मॅनेजरने युवकाला चापट मारली. चिडलेल्या युवकाने मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. दरम्यान या घटनेनंतर मॅनेजर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नाशिक, शिर्डीतून संशयित ताब्यात

दरम्यान या घटनेत पेट्रोल पंपाजवळील हॉटेलवरील एक कर्मचारीही संशयिताने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी सिसीटिव्ही आणि मिळालेल्या माहितीनुसार तातडीने तपास करत नाशिक जिल्ह्यातून एकाला आणि शिर्डीतून एकाला ताब्यात घेतले आहे अशी माहिती संदिप मिटके (पोलीस उपअधीक्षक, शिर्डी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT