Pune Chandani Chowk Accident News : पुण्यातील चांदणी चौकातील अपघातात चार प्रवासी जखमी, जाणून घ्या वाहतूकीची स्थिती

Pune Traffic Updates : प्रवाशांच्या मदतीला वाहन चालक धावले.
Chandani Chowk News , Pune News
Chandani Chowk News , Pune Newssaam tv
Published On

- सचिन जाधव

Chandani Chowk News : पुण्यातील चांदणी चौकात आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास एका खासगी छाेट्या प्रवासी बसचा अपघात झाला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार प्रवासी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पलटी झाली. (Maharashtra News)

Chandani Chowk News , Pune News
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले, शहापूरच्या 'त्या' समस्येवर उपाययाेजनेस प्रारंभ

आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी चांदणी चाैकात अपघात (accident) झाल्याने येथील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार कर्वेनगरकडून हिंजवडीच्या दिशेने बस निघाली हाेती. या बसमध्ये चार प्रवासी हाेते. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Chandani Chowk News , Pune News
Satara News : ...अन्यथा 2 दिवसांत सातारा बंद ठेवणार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सरकारला इशारा

या अपघातानंतर तातडीने काही वाहनधारक बसमधील प्रवाशांच्या मदतीला धावले. या अपघातामुळे चांदणी चाैकातील मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. रस्त्यावर पलटी झालेली प्रवासी बस रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरू झाले हाेते. सध्या या मार्गावरील वाहतुक सुरळीत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Chandani Chowk News , Pune News
Raju Shetti News : राजू शेट्टींची किल्ले रायगडावरुन माेठी घाेषणा; 30 सप्टेंबरपर्यंत शेतक-यांसाठी 'स्वाभिमानी' चे राज्यात माेठं अभियान

दरम्यान चांदणी चौकातील प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या गर्डर उभारणीसाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने १५ जुलैपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची वाहन चालकांनी नाेंद घ्यावी असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com