Shinde Sena workers celebrate victory in Konkan after dominating municipal election results. saam tv
महाराष्ट्र

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

Shinde Group Victory In Konkan : कोकणात ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळलाय. तर शिंदेंनी मुसंडी मारलीय. मात्र शिंदेसेना आणि ठाकरेसेनेनं किती नगराध्यक्षपदं राखले आहेत.याबरोबरच या निवडणुकीचा मुंबई महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

हा जल्लोष आहे कोकणातील शिंदेसेनेच्या विजयाचा. हा जल्लोष आहे कोकणातून ठाकरेसेनेचा सुफडा साफ केल्याचा. होय. ठाकरेंची शिवसेना आणि कोकण एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जायच्या. मात्र सलग तिसऱ्या निवडणुकीत कोकणात ठाकरेसेनेचा सुफडा साफ झालाय. या निकालातून खरी शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.

खरंतर कोकण आणि शिवसेनेचं एक भावनिक नातं. मात्र याच कोकणानं सलग तिसऱ्या निवडणुकीत ठाकरेंचा सुफडा साफ केलाय.. खोपोली ते महाड आणि रत्नागिरी ते मालवण शिंदेसेनेनं ठाकरेसेनेला पराभवाची धूळ चारलीय.फक्त श्रीवर्धनचं नगराध्यक्षपद राखण्यात ठाकरेसेनेनं यश मिळवलंय.

कोकणात शिंदेसेनेची मुसंडी

मालवण

कणकवली

खेड

रत्नागिरी

चिपळूण

लांजा

माथेरान

खोपोली

महाड

श्रीवर्धन- ठाकरेसेना

खरंतर कोकणातील शिंदेसेनेच्या विजयाला कारण ठरलंय ते शिवसेनेच्या फुटीपासूनच शिंदेंनी कोकणावर केंद्रीत केलेलं लक्ष.. नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंनी कोकणात सभांचा धडाका लावला होता. नगरपालिका निवडणुकीत शिंदेंनी कोकणात किती सभा घेतल्या? पाहूयात.

कोकणात शिंदेंच्या सभांचा धडाका

मालवण

वेंगुर्ला

सावंतवाडी

रोहा

चिपळूण

लांजा

एका बाजूला शिंदेंनी कोकणात सभांचा सपाटा लावला होता.. तर ठाकरेसेनेच्या एकाही नेत्यानं इथे सभा घेतली नाही, प्रत्यक्षात निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या ठाकरेसेनेनं या पराभवाचं खापर मात्र ईव्हीएमवर फोडलंय.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोकणातील ठाकरेंची स्पेस शिंदेनी बळकावलीय. त्यामुळे कोकणातील निकालाचा मुंबई महापालिकेच्या निकालांवर काय परिणाम होणार? आणि कोकणापाठोपाठ मुंबईतही शिंदेंचा करिष्मा चालणार का? यावर ठाकरेंचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

Kalyan Politics: ऐन निवडणुकीत मनसेला पुन्हा झटका; बड्या महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT