Nagar Dehre Village Police use JCB on house of the accused Saam TV News
महाराष्ट्र

मुलाला मारण्याची धमकी, आईला पळवून नेलं, आरोपींच्या घरावर जेसीबी चालवलं; अहिल्यानगरमध्ये काय घडतंय?

Ahilyanagar Dehre JCB Driven House Accused : आरोपींचे देहरे गावात अतिक्रमण करून घर आणि दुकाने बांधण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात आरोपींचे घराचे आणि दुकानांचे अतिक्रमण काढलं.

Prashant Patil

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील देहरे या गावात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एका महिलेचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेत असलेल्या तिन्ही आरोपींविरोधात महिलेवर अत्याचार करणे, पळवून नेणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यानंतर, आरोपींचे देहरे गावात अतिक्रमण करून घर आणि दुकाने बांधले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी तिघे आरोपींचे घराचे आणि दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु करण्यात आली. तसेच गावातील असे अतिक्रमण हटवणार असल्याची माहिती ग्रामसेवक नंदकुमार साळवे यांनी दिली. या घटनेतील एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर तालुक्यातील देहरे या गावात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नगर मनमाड रोडवर असलेल्या देहरे गावातील एका महिलेला मुलाला मारण्याची धमकी देऊन पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या इसमांची इंस्टाग्रामवर त्या महिलेशी ओळख झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी महिलेचा छळ करून अत्याचार केल्याची घटनाही समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT