Uddhav Thackeray Latest Speech
Uddhav Thackeray Latest Speech Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : 'फडतूस म्हणजे बिनकामाचा', उद्धव ठाकरे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

संजय डाफ

Uddhav Thackeray Latest Speech : नागपूर (Nagapur) येथे आयोजित  महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत (Vajramuth Sabha) उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांचा फडतूस म्हणून उल्लेख केला आहे. बिनकामाचा, असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, मी हल्ली शब्द जपून बोलत आहे. तरी नेभळट हा शब्द गेलाच. काही दिवसांपूर्वी मी फडतूस शब्द वापरला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. फडतूस म्हणजे

Vajramuth Sabha : ... त्यांना घराणेशाहीला झुकावे लागले : उद्धव ठाकरे

अमित शाह यांना लक्ष करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. जे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोलतात त्यांना घराणेशाहीसमोर झुकावे लागले. जे देशासाठी काम करतात, समाजसेवेचे काम करतात त्यांच्यासाठी झुकावेच लागते. (Latest Marathi News)

अदानींच्या मुद्द्यावर मोदी सरकाराला लक्ष करत उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा क्रम घसरत चालला आहे, मात्र यांच्या मित्रांचा क्रम वाढत चालला आहे. ते म्हणाले, ही बाबासाहेबांनी माणसाला माणसाचा अधिकार दिला ही तीच भूमी नाही. संविधान संपविण्याचं काम सुरू आहे. एक माणूस घटना लिहू शकतो, तर कोट्यवधी लोक या घटनेचे रक्षण करू शकत नाही. मी घटना बचाव म्हणणार नाही, घटनेचे रक्षण मीच करणार ही म्हणण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येला मी गेलो होतो. त्यावेळी सुनील केदार सुद्धा होते. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. पहिले मंदिर असं आम्ही म्हणत होतो. त्यावेळी ते नाही म्हणत होते. मात्र कोर्टाने निर्णय दिल्यावर हे टीकोजीराव आम्ही राम मंदिर केले सांगत आहेत.

ते म्हणाले, खरंच यांच्यात हिंदुत्व असतं, तर हे गुवाहाटीमध्ये नाही तर अयोध्येला गेले असते. आता दोघंही सोबत गेले, हेही कधी गेले नव्हते. राम राज्य कधी या देशात येणार. शेतकरी संकटात आहेत आणि मुख्यमंत्री देवदर्शन करत आहेत.

शिंदे- फडणवीस सरकारला लक्ष करत ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे घरबाहेर पडले नाही, असा आरोप व्हायचा. मग आमचे सहकारी काय करत होते. घरून काम होत होतं. म्हणून देशात पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात आहेत. पंतप्रधान हे समोर येऊन बोलत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT